Wednesday, July 15, 2009

''कणा''

''ओळखलत का सर मला-''पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले,केसांवरती पाणी
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून
'गंगामाई पाहुनी आली गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी-बायको मात्र वाचली
भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले
प्रकाश म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेवून संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
'पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला-
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा;'

7 comments:

 1. khup sundar kavita aahe. mi pahilyanda aikali tevha mala mazya shalechi aani shikshakanchi prakarshane aathwan zali.

  ReplyDelete
 2. वाह माझी सगळ्यात आवडती कविता. :)
  अनुजा हा ब्लॉग सुरु करुन तु किती अप्रतिम कार्य केले आहेस. मनापासुन धन्यवाद. येऊदेत अश्याच सुंदर सुंदर कविता.

  दिपक

  ReplyDelete
 3. खूपच छान. शाळेत शिकत असतानाची ही माझी सर्वात आवडती कविता होती...

  ReplyDelete
 4. माझीही अत्यंत आवडती कविता

  ReplyDelete
 5. कुसुमाग्रजांच्या सुंदर दोन आणखी कविता, १ स्वप्नांची समाप्ती २. समिधा share please.

  ReplyDelete