Tuesday, July 14, 2009

कोलंबसाचे गर्वगीत.

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या
समुद्रा,डळमळू दे तारे
विराट वादळ हेलकावू दे पर्वत पाण्याचे
ढळू दे दिशाकोन सारे

ताम्रसुरा प्राशुनी मातु दे दैत्य नभामधले
दडू द्या पाताळी सविता
आणित्यांची ही अधिराणी दुभंग धरणीला
कराया पाजळू दे पलिता

की स्वर्गातून कोसळलेला ,सूड-समाधान
मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनी मेळा वेताळांचा या दर्यावरती
करी हे तांडव थैमान

पदचुता तव भीषण नर्तन असेच चालू दे
फुटू दे नभ माथ्यावरती
आणि तुटू दे अखंड उल्का वर्षावत अग्नी
नाविका न कुठली भीती

सहकार्यानो,का ही खंती जन्म खलाशांचा
झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रापारी असीम नीलामध्ये संचरावे
दिशांचे आम्हाला धाम

काय सागरी तारू लोटले परताया मागे
असे का हा अपुला बाणा
त्याहून घेवू जळी समाधी सुखे,कशासाठी
जपावे पराभूत प्राणा

कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अन मरती
जशी ती गवताची पाती,
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली
निर्मितो नाव क्षितिजे पुढती

मार्ग अमुचा रोखू शकती ना धन ना दारा
घराची वा वितभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात
जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती
कथा या खुळया सागराला
''अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा
किनारा तुला पामराला''

7 comments:

  1. ''अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा
    किनारा तुला पामराला'' apratim! kusumaagrajaannaa trivaar salaam!!!

    ReplyDelete
  2. अनुजा-बाई : तीन ओळींत बदल करायला हवा.
    > कोट्यावधी जगतात जीवाणू
    - कोट्यवधी किंवा कोट्यावधि, मला वाटतं शिरवाडकरांनी 'कोट्यवधी' शब्द वापरला आहे. आणि 'जिवाणू' ...

    > निर्मितो नाव क्षितिजे पुढती
    - नवक्षितिजे (एकच शब्द, आणि 'नाव' नाही तर नव)

    > मार्ग अमुचा रोखू शकती ना धन ना दारा
    - आमुचा रोधू ; 'अमुचा' हे चूक; 'रोखू'-हे चालेल, पण माझ्या आठवणीनुसार कवितेत 'रोधू' शब्द वापरला आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर 'कोट्यवधी' च पाहिजे

      Delete
  3. अज़ून काही बदल करावे लागतील.
    लिहिण्याआधी ओळ म्हणून पहा. ओळीचं नादमय उच्चारण न ज़मल्यास काहीतरी चूक शिरली आहे, हे हमखास समज़ा.

    हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या
    - गर्जु की गर्जू, हे मूळ पुस्तकात तपासा.

    आणित्यांची ही अधिराणी दुभंग धरणीला
    - आणि तयांची

    जमवुनी मेळा वेताळांचा या दर्यावरती
    - ज़मवुनि ('नि' मात्रेत बसतो.)

    पदचुता तव भीषण नर्तन असेच चालू दे
    - पदच्युता
    नाविका न कुठली भीती
    - ना कुठली

    सहकार्यानो,का ही खंती जन्म खलाशांचा
    - cut-paste सहकार्‍यांनो, or try sahakaaRyaa.nno

    "अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा
    . - अमुची
    किनारा तुला पामराला"
    No point in using two single-quotes at both ends, either use one single-quote or one double-quote and stick to it for both ends.

    ReplyDelete
  4. That's great...
    A salute to Vi Va Shirwadkar

    ReplyDelete
  5. मरगळ झटकून मनाला उभारी देणारे शेलके शब्द.
    अप्रतिम.

    ReplyDelete